लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १२ जुलै २०२४ :
शुक्रवारी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती श्रीगोंदा येथे तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदे विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ मुजीब शेख हे होते.
या कार्यक्रमामध्ये भारतीय न्याय संहिता -२०२३, भारतीय नागरी सुरक्षा संहिता -२०२३, भारतीय साक्ष अधिनियम -२०२३ या नवीन कायद्या विषयक माहिती देण्यात आली तसेच इतरही कायदे विषयक मार्गदर्शन करताना कायद्यातील नियमानुसार पोलिसांनी कशी कार्यवाही करावी या गोष्टींची माहिती देण्यात आली. पोलीस तपासातील येणाऱ्या समस्यांवर कायदे विषय सखोल माहिती व बारकावे यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ श्रीगोंदा मुजीब शेख, अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी श्रीगोंदा जी. एम. साधले, अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी श्रीगोंदा एच. जे. पठाण यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. प्रश्नोत्तराद्वारे विविध विषयांवर चर्चा झाली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा डी. पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीगोंदा एस. पी. केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी जगताप यांनी केले.