लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १३ जुलै २०२४ :
वांगदरी वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी सर्जेराव शिवाजी मासाळ यांची दि. ९ रोजी बहूमताने निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया वांगदरी वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये पार पडली.
या निवडी वेळी आप चे जिल्हा उपाध्यक्ष व संचालक राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी निवडीची सूचक म्हणून तर संचालक मोहन मिठू चोरमले यांनी अनुमोदन दिले. सोसायटी संचालकांच्या उपस्थितीत बहुमताने ही निवड करण्यात आली.
निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र शिवाजीराव नागवडे, सरपंच संजय नागवडे , माजी सरपंच आदेश नागवडे , चेअरमन विजय नागवडे , मा.व्हा. चेअरमन भाऊसाहेब हांडाळ, मा.ग्रामपंचायत सदस्य मधुकर नागवडे व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले निवडणूक अधिकारी म्हणून मुंडे साहेब यांनी कामकाज पहिले.