लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १५ जुलै २०२४ :
मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंत मोरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. यावेळी मंचकावर शिवसेना उपनेते साजन पाचपुते, राणीताई निलेश लंके, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख विजय शेंडे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शनिवार दि. १३ रोजी श्रीगोंदा येथे साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन खा. संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेले या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी अनेक कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.
साजन पाचपुते यांच्या रूपाने उत्तम संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाला आहे असं खा. संजय राऊत यांनी म्हटले. संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे साजन पाचपुते यांनी यावेळी सांगितले. सामान्य कार्यर्त्यांसाठी हे कार्यालय स्थापन केले आहे असंही ते म्हणाले.