टीम लोकक्रांती : काष्टी दि. ७ सप्टेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव या ठिकाणी दि. ३० ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मातंग स्मशानभूमी व संरक्षण भिंत बांधकाम करणे या संदर्भात सचिन भरत शिंदे यांनी सुचवले होते अनुमोदन मनोहर दिलीप शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले.आढळगाव सरपंच शिवप्रसाद उबाळे अध्यक्षते खाली सर्वांमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावाची प्रत दि.६ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय बबनराव पाचपुते यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पाचपुते यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे व ग्रामस्थ यांनी पाचपुते ताईंकडे देऊन आणखी भरीव निधीची मागणी करण्यात आली व त्यावेळी पाचपुते ताई म्हणाल्या लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ आणि ग्रामस्थांचे प्रश्न सोडवू मार्गी लावू.
स्त्रोत-(पत्रकार सचिन शिंदे)