लोकक्रांती
श्रीगोंदा, दि २० जुलै २०२४ :
अग्नीपंख फौंडेशनने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात श्रीगोंदा ते पंढरपूर १७५ किमीची सायकल वारी करणारे दौड, श्रीगोंदा, राशीन येथील सायकल वारकरी व सी ए, पोलिस काॅस्टेबल, परिक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आंब्याचे रोप देऊन कर्जतचे पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, उद्योजक विठ्ठलराव जगदाळे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी दररोज पाच किमीची पायपीठ करुन दहावीत ९८ टक्के गुण मिळविणारी अनुष्का थोरात (येळपणे) आई वडीलांचे छत्र हरपलेली अनुजा सोनवणे( लोणीव्यंकनाथ) हिला शिक्षणासाठी मदत, कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, शिवदुर्गचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांचे व निंबळक सायकल स्व. कानीफनाथ कोतकर यांचे कुटुंबीसाठी मदत शिवशंभुच्या अध्यक्ष विजया लंके यांचेकडे सुपूर्त करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सुभाष धुमाळ होते. पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे म्हणाले की अग्नीपंख फौंडेशनला सत्कार मुर्तींना आंब्याचे रोप मोठ्या आत्मियतेने दिले आहे यांचे संगोपन उत्कृष्ट या कार्यक्रमाची स्मृती जागृत ठेवावी तुमच्या जीवनात गोडवा निर्माण होईल. सुभाष धुमाळ म्हणाले अग्नीपंख फौंडेशनने सायकल पटूंचा सन्मान करताना विद्यार्थ्यांना मदतीचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यातून समाजात परिवर्तन होते.
यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले नवनाथ दरेकर भाऊसाहेब वाघ ज्ञानेश्वर खेतमाळीस अॅड कावेरी गुरसल गोपाळ डांगे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक प्रशांत दरेकर यांनी तर आभार मिठू लंके यांनी मानले.
चौकट
आशाबाईंचे आनंदाश्रू : लग्न झालेनंतर बारावीची परिक्षा दिली दोन मुलं झाली घरची परिस्थिती खुप नादान होती. माझे पती मागे उभे राहिले. आणि मी पोलिस नोकरीतून भाकरीचा चंद्र शोधण्याचे ठरविले मुल झोपीत असताना मी मैदानावर असायची आणि वयोमर्यादानुसार शेवटची संधी होती मिरा भाईंदर पोलिस काॅस्टेबल पदाच्या लिस्ट मध्ये माझे नाव दिसले आणि आनंद झाला हे सांगताना आशाबाई मेहेत्रे अस्वर यांच्या डोळ्यात पाणी आले.