पावसाने प्रभावित झालेल्या पिकांचे पंचनामे करा- आ. पाचपुते

पालकमंत्री विखे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २६ जुलै २०२४ :
राज्यभरासह श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असुन श्रीगोंदा तालुक्यातील उडीद, कांदा,कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे या प्रभावित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे. आज या मागणीचे निवेदन आ.पाचपुते यांच्या वतीने तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,बाळासाहेब महाडिक,नितीन नलगे, विठ्ठल चव्हाण,गणेश लगड,आदित्य अनवणे यांनी दिले.

मागील आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पेरलेला कांदा,उडीद,कापूस आदी पिके मोठ्या प्रमाणात पावसाने प्रभावित झाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या नुकसान ग्रस्त पिकांची महसूल व कृषी विभागाच्या वतीने संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

चौकट :
ओहरफ्लो च्या आवर्तनातुन शेततळे व पाण्याचे श्रोत भरुन घ्यावेत-विक्रम पाचपुते. सध्या कुकडी धरण क्षेत्रात पावसाच्या पाण्याची चांगल्या प्रकारे आवक असुन येडगाव धरणातून ओहरफ्लोचे आवर्तन सोडण्यात आले आहे.या आवर्तनातुन शेततळे व पाण्याचे श्रोत भरून घ्यावेत असे आव्हान भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
80 %
7.8kmh
100 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °
error: Content is protected !!