लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २७ जुलै २०२४ :
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ व फळ वाटप करण्यात आले, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी गेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेतमाळीस मळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मखरेवाडी, येथील मुला मुलींना खाऊ व फळ वाटपाचा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अहिल्यानगर दक्षिण शिवसेनेच्या वतीने विविध गावांमध्ये संपन्न झाला.
शिवसेना नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिवसैनिक हा समाजकारण करण्यासाठी सर्वात पुढे असतो त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमासाठी सुरेश देशमुख, संभाजी घोडके, शहाजी बोरुडे, सुभाष आनंदकर, जमील शेख, नितीन लोखंडे, रोहिदास मस्के, बापू मस्के, सुनील घोडके, बाळासाहेब मस्के, सुशांत भंडारी व सर्व शाळेमधील शिक्षक शिक्षिका शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.