लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २८ जुलै २०२४ :
कोळगाव येथे श्री. कोळाईदेवी विद्यालयात शिक्षण -सप्ताह निमित्त आयोजित शालेय पोषण आहार व उष्मान्क दिन निमित्त विद्यालयचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात विविध उपक्रम करण्यात आले.विद्यालयाच्या शालेय पोषण आहार प्रमुख एम. बी. धिवर मॅडम यांनी दैनंदिन आहारातील पोषण तत्वे मुलांना माहिती व्हावीत या उद्देशाने प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले. या प्रसंगी महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड, कोळगावचे माजी उपसरपंच नितीन नलगे आदी मान्यवर विध्यार्थी व पालक उपस्थित होते.
या प्रदर्शनात इ. ९ वी च्या मुलींनी लहान मुलांचे आवडते कार्टून डोरेमॉन काढले. कडधान्य व तृणधान्य, फळे, बीट, कोबी, ऑरगॅनिक फूड कलर यांचा वापर करून सजावट केली. ही प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरली त्याचबरोबर आरोग्याचा कलश ही संकल्पना, धान्य -पालेभाज्या, फळभाज्या, यांनी सजावला. या प्रदर्शनात विविध पोषणतत्त्व देणारे पदार्थ, प्रतिकृती – फाळ भाज्यांपासून गणपती, उंदीर, विविध आकार, इंद्रधनुषी थाळी, तिरंगी डिश, पौष्टिक पदार्थ, व त्यातून मिळणारे पोषणतत्व यांचे तक्ते होते.
प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी मान्यवरांना पोषण घटक यांची माहिती दिली. प्रदर्शन आयोजन उत्कृष्ठ असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली व विध्यार्थ्यांना शाबासकीही दिली यामुळे विद्यार्थी आनंदाने भारावून गेले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड यांनी विद्यार्थ्यांसाठी भोजन दिले. आनंदी वातावरणा मध्ये हा उपक्रम पार पडला.
या प्रदर्शनासाठी शा. पो. आ. विभागप्रमुख मंजुश्री धिवर, प्रा. अन्नपूर्णा जोशी यांनी मार्गदर्शन केलें.तसेच विद्यालयातील बी. एन.सब्बन मॅडम, के. पी.शेळके मॅडम, यु. एस.बांडे मॅडम, एम. टी.गलांडे सर, मनीषा नलगे, दादासाहेब पांढरे, शेख मॅडम आदी शिक्षक ही उपस्थित होते.