लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३१ जुलै २०२४ :
तहसील कार्यालय श्रीगोंदा येथील दिगंबर पवार यांनी वाटपपत्राचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी रवींद्र महांडुळे यांच्याकडून पैशाची मागणी करत असल्याचा दावा केला असुन पैसे घेऊन देखील काम करत नसल्याची तक्रार संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांच्याकडे महांडुळे यांच्याकडून करण्यात आली. पवार हे अनेकवेळा कार्यालयात उपस्थित नसल्याचे देखील वारंवार संभाजी ब्रिगेडकडून काही विषयांचा पाठपुरावा करताना दिसून आले आहे.
यामुळे पवार यांचे एकुनच कामकाज शंकास्पद असल्याने त्यांची मागील तीन महिन्याची दैनंदिन पाहावयास मिळावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर पवार यांना तात्काळ निलंबित करुन वारीष्ठ पातळीवर त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी अन्यथा दि. ५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
चौकट
पवार यांनी किंवा दुसऱ्या कोणी कर्मचाऱ्यांनी काम करुन देण्यासाठी पैश्याची मागणी केली असेल तर संभाजी ब्रिगेडशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ – इंजि. शामभाऊ जरे (तालुकाध्यक्ष)
संभाजी ब्रिगेड पक्ष