सरकारने संवेदनशील होऊन पत्रकारांना न्याय द्यावा अन्यथा पत्रकारांकडे लेखणीसोबतच मतांची देखील ताकद आहे – वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शिर्डी येथे समारोप..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि ३ जुलै २०२४ :
सामान्य पत्रकार हा समाजाच्या प्रश्नांसाठी व्यवस्थेशी झगडत राहतो आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो मात्र आता न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा एकत्रित बुलंद आवाज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारने संवेदनशील होऊन पत्रकारांना न्याय द्यावा अन्यथा पत्रकारांकडे लेखणीसोबतच मतांची देखील ताकद आहे.
एका मतदारसंघात संघात वीस पत्रकारांनी वैयक्तीक पातळीवर प्रत्येकीती ५०० मत दिली तर राज्यात तीस लाख मतांचा गठ्ठा होईल. मग ही मत कोणी बघणार की नाही? पत्रकारांच्या मतांची गरज आहे की नाही?असा प्रश्न करत सरकारने पत्रकारांच्या मागण्यांसाठी तात्काळ निर्णय घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख वसंत मुंडे यांनी शिर्डी येथे पत्रकार संवाद यात्रेत बोलताना केले.

शिर्डी येथे २८ जुलै २०२४ रोजी दिक्षाभूमी ते नागपूर पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, धुळे, जळगाव, शेगाव या मार्गे श्रीक्षेत्र शिर्डी येथे २ ऑगस्ट रोजी दाखल झाली. यावेळी स्थानिक पत्रकारांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी,मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे,अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे उपस्थित होते.यावेळी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे व मनसे पदाधिकारी यांची पाठिंबा दिला.यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की,साई बाबानी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण जगाला दिली. अशा संत नगरीत यात्रेचा समारोप होत आहे. नागपूर येथील दिक्षाभूमी येथून संवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यावेळी मला मनात थोडी सांशकता होती.मात्र जसा संवाद यात्रेचा प्रवास सुरू झाला तसे वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव, धुळे ते आज शिर्डी या प्रवासा दरम्यान विविध तालुके छोटी छोटी गावे येथील पत्रकारांच्या विविध संघटनांनी उस्फूर्तपणे पाठबळ दिले. एवढेच नव्हे तर विविध लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते,सामान्य जनता यांनी संवाद यात्रेचे स्वतः हून उस्फूर्त स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला. या भागातून प्रवास करत असताना पत्रकारांनी त्यांच्या वास्तव समस्या जेव्हा समोर मांडल्या तेव्हा मी केवळ २० प्रमुख समस्याना सोबत घेऊन निघालो होतो. आता या मागण्यांमध्ये मुंबईला जाई पर्यंत किती वाढ होईल हे आज सांगू शकत नाही.याचाच अर्थ पत्रकारांच्या समस्या होत्या आणि आहेत.केवळ या समस्यांना वाचा कोणी फोडायची ? जगाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना आपलेच प्रश्न कुणापुढे मांडावेत ? हा प्रश्न पडला होता.हे वास्तव या संवाद यात्रेच्या माध्यमातून समोर येत आहे.आज पर्यंत लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही सरकारकडे न्याय हक्काच्या मागण्या मागितल्या.यातील काही मागण्यांना सरकारने न्याय दिला.मात्र त्यामध्ये जाचक अटी टाकल्या.यामुळे त्या सुविधांचा लाभ सुलभपणे होत नाही.आता आमची मागणी एवढीच आहे पत्रकारांना अधीस्वीकृती सहज मिळावी आणि ज्येष्ठ पत्रकारांना वयाच्या साठव्या वर्षीच तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सन्मान पेन्शन योजना मिळावी.

शिर्डी येथे संवाद यात्रेत सहभागी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार

यासह विविध न्याय मागण्यांना सरकारने २० ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन पत्रकार देखील लाडकी बहीण, लाडका भाऊ याप्रमाणे लाडका पत्रकार देखील आहे हे सिद्ध करून पत्रकारांच्या हिताचे निर्णय शासन स्तरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जाहीर करावेत. पत्रकारांकडे लेखणी बरोबरच मतांचीही शक्ती आहे याचा विचार सरकारने करावा. पत्रकार व त्यांच्या संपर्कातील मतदार एकत्रित केले तर एक सामान्य पत्रकार वैयक्तिक पातळीवर पाचशे मत देऊ शकतो त्यामुळे एका मतदारसंघात दहा हजार आणि राज्यात तीस लाख मतांचा गठ्ठा होईल मग ही मत पाहिजेत का नाही ? हे सांगण्याची वेळ आली आहे.यामध्ये आम्हाला कसलेही राजकारण करायचे नाही. तो आमचा पिंड ही नाही. आम्ही आमच्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी प्रामाणिकपणे लढत आहोत, एवढीच आमची या संवाद यात्रे मागील प्रमुख भूमिका आहे. असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिले.

याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी ही संवाद यात्रा वंचित पीडित अन्यायग्रस्त पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यभरातून पत्रकारांच्या प्रश्नांना उजाळा देत जागर करत निघालेली आहे. सुदैवाने या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री हे संपादक लाभले. यापूर्वी दैनिक सामनाचे संपादक उद्धवराव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होऊन गेले तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे देखील संपादक असल्याने ते पत्रकारांच्या प्रश्नांना या संवाद यात्रेच्या माध्यमातून नक्कीच न्याय देतील. असा विश्वास व्यक्त करून वसंत मुंडे यांच्याकडे नेतृत्व दातृत्व आणि कर्तुत्व असल्याने त्यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांची जाण असलेले लाडके नेतृत्व वसंत मुंडे यांच्या रूपाने पत्रकारांना लाभले आहे. पत्रकारांना देखील प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात ही भूमिका आता पत्रकारांसह जनसामान्यांना देखील मान्य झाली आहे. हेच संवाद यात्रेचे पहिले यश आहे. त्यामुळे आता ही यात्रा कुठेही थांबणार नाही. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून दिल्यावरच हा संघर्ष थांबेल असे जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले.प्रास्ताविक अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे,यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार महेश शिंगोटे यांनी केले.तर आभार प्रसिद्धी प्रमुख भीमराव वाकचौरे यांनी मानले. पत्रकार संवाद यात्रेतील पहिल्या टप्प्याच्या समारोपात राज्यभरातील पत्रकार आणि पत्रकार प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट :
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विविध पत्रकार संघटनेने एका छताखाली आले पाहिजे – किसन भाऊ हासे. पत्रकारांच्या विविध संघटना आहेत.या सर्व संघटनांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या प्रश्नांचा जागर करत निघालेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास मुंबई येथे उपस्थित राहून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी जाहीर पाठिंबा देऊन सरकारला एकजुटीचे दर्शन घडवत न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले पाहिजे असे मत व्यक्त केले. या भूमिकेतून आज मी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचा जाहीर पाठिंबा शिर्डीतील या संवाद यात्रेतील पहिल्या टप्प्यातील समारोपामध्ये देत असल्याचे जाहीर करून पत्रकारांच्या हितसंबंधातील काही आणखीन मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्याकडे दिले.

चौकट :
नाशिकच्या जिल्हा शाखेकडून संवाद यात्रेतील सहभागी पत्रकारांचा सन्मान पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप कोठावदे आणि ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील तसेच राम बंधु परिवार नाशिक यांच्या वतीने पत्रकार संवाद यात्रेमध्ये नागपूर ते शिर्डी दरम्यान जे जे सहभागी झाले त्या सर्वांना गीतेच्या ग्रंथासह मिठाई भेट देऊन स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!