लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ५ ऑगस्ट २०२४ :
मांडवगण एसटी स्टॅण्ड ते मराठी शाळा या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे लक्ष वेधण्यात आले होते.या रस्त्याने शाळा तसेच प्राथमीक आरोग्य केंद्र,बाजारतळा कडे जाताना नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय व्हायची तसेच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती.संभाजी ब्रिगेडच्या आंदोलन नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वराळे यांच्या वतीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला देण्यात आले होते. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे वराळे साहेब यांच्या हस्ते या रस्त्याचा शुभारंभ करून कामाची सुरुवात करण्यात आली.
रस्ता काँक्रिटिकरण मुळे नागरिकांची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेळोवेळी या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख,वराळे साहेब,राहुल शिंदे,सिद्धार्थ घोडके,माऊली कण्हेरकर, गणेश लोखंडे,योगीराज मोटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.