लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ५ ऑगस्ट २०२४ :
अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी श्रीगोंदा तालुक्यातील दौऱ्या दरम्यान श्रीगोंदा तहसिल कार्यालय, पंचायत समिती श्रीगोंदा आणि नगरपरिषद श्रीगोंदा येथे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला.
तसेच श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाला आज भिमानदी पुराच्या पाण्याने पुन्हा विळखा घातल्याची माहिती समोर आल्यावर त्याची पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी त्या ठिकाणी भेट दिली या वेळी येथील ग्रामस्थांच्या समस्या काॅग्रेस नेते घनःशाम शेलार यांनी जिल्हाधिका-यां समोर मांडून आर्वी बेट ते आर्वी असा जलसेतू बांधान्यावर लक्ष वेधले. पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थ, महीला व विद्यार्थांना जीव धोक्यात घालून ये -जा करावी लागते म्हणून रोप- वे उभारावा यासह अन्य मागण्या केल्या याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यात श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पंचायत समिती बीडीओ राणी फराटे, नगरपालिका मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत, प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.