लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ५ ऑगस्ट २०२४ :
कोळगाव व परिसरातील तरुण युवकांनी नुकत्याच विविध स्पर्धांमध्ये नेत्र दीपक यश मिळवून नोकरी मिळविली त्यांच्या या यशाबद्दल कोळगाव ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आमदार बबनराव पाचपुते हे होते.
जलसंपदा विभागामध्ये जिक्रिया अकबर पिरजादे व ऋषिकेश प्रल्हाद लगड यांना स्थापत्य अभियंता सहाय्यक ,संदीप बाळासाहेब शिंदे यांना ट्रेसर म्हणून नियुक्ती मिळाली. प्रशांत मारुती भोईटे यांची कामगार तलाठी म्हणून नेमणूक झाली तर कोथरूड येथील सचिन दिगंबर धस यांची पीएसआय पदी निवड झाली तसेच पारनेर सैनिक बँकेमध्ये स्वीकृत संचालक म्हणून भानुदास मारुती सपाटे मेजर यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोळगाव ग्रामपंचायत मध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते व कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच संतोष मेहत्रे ,ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्व उमेदवारांची विविध परीक्षांमध्ये यश मिळवून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच जिद्द, कष्ट, परिश्रम यांच्या जोरावर कुठल्याही संकटाशी धैर्याने तोंड दिल्यास अपेक्षित यश प्राप्त होते असे प्रतिपादन केले.
यावेळी कोळगाव चे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच संतोष मेहत्रे, माजी उपसरपंच नितीन नलगे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, निखिल लगड, प्रदीप आढाव, प्रल्हाद लगड, अकबर पिरजादे, भानुदास सपाटे मेजर, कृष्णा बाराहाते, नामदेव सातपुते,धोंडीबा लगड, अनिल नलगे ,दिलीप बाराहाते, दगडू कर्डिले, उल्हास नलगे, रामदास शिंदे, विनायक लगड, मारुती भोईटे, यश पुरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व उत्तीर्ण झालेल्या व नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.