लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ६ ऑगस्ट २०२४ :
तालुका शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामध्ये पार पडली, यावेळी बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ क्रीडा शिक्षक विठ्ठलराव बुणगे यांनी भूषविले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजना संदर्भात सहविचार सभा पार पडली यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धांच्या आयोजना संदर्भात सविस्तर चर्चा झाली व पुढील प्रमाणे वेळापत्रक सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
कुस्ती –
दि.१६ ऑगस्ट -सर्व मुले
दि.१७ ऑगस्ट – सर्व मुली
ठिकाण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
क्रिकेट –
दि.२० ऑगस्ट – सर्व वयोगटातील मुले
दि.२१ ऑगस्ट – सर्व वयोगटातील मुली
ठिकाण परिक्रमा संकुल काष्टी
फुटबॉल –
दि.२६ ऑगस्ट – सर्व गटातील मुले ,मुली
ठिकाण परिक्रमा संकुल काष्टी
बुद्धिबळ
दि.२७ ऑगस्ट – सर्व मुले मुली
महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा
खो खो
दि.३० ऑगस्ट – १४/१७ वर्ष वयोगटातील मुले
ठिकाण श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालय वांगदरी
दि.३१ ऑगस्ट – १४/१७/१९ वर्ष वयोगटातील मुली
व १९ वर्ष वयोगटातील मुले
ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा
कबड्डी
दि. ३ सप्टेबर – सर्व मुले
दि. ५ सप्टेबर – सर्व मुली
ठिकाण परिक्रमा संकुल काष्टी
मैदानी स्पर्धा
दि.१३ सप्टेबर – सर्व मुले
दि.१४ सप्टेबर – सर्व मुली
ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा.
हॉलीबॉल व बास्केटबॉल या संबंधित तारखा व ठिकाण नंतर कळविण्यात येतील.याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे तरी सर्व क्रीडा शिक्षकांनी तात्काळ प्रायमरी फॉर्म भरून घेणे आणि क्रीडा स्पर्धांसाठी सहकार्य करावे असे आवाहन श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार यांनी केले.यावेळी आबा इथापे सर यांनी आईच्या पुण्यस्मरण निमित्त ट्रॉफी देण्याचे जाहीर केले. सभेचे प्रास्ताविक रवींद्र भोंडवे तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले.