लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ६ ऑगस्ट २०२४ :
वॉटर शेड संस्थेच्या वतीने उन्हाळ्यात मांडवगण येथे डोंगरांनी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगरमाळावर चाऱ्यांचे खोदकाम करण्यात आले होते या चार्यांच्या कडेने जांभूळ,लिंब,आवळा यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचे आज श्री.सिद्धेश्वर महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वॉटर शेड संस्थेच्या माध्यमातून मांडवगण मध्ये कोट्यवधी रुपयांचे चार्या खोदण्याचे,दगडी बंधारे बांधण्याचे काम करण्यात आलेले आहे.या प्रकल्पाने गावातली पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.मांडवगण मध्ये अजून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
यावेळी सिद्धेश्वर महाविद्यालचे प्राचार्य, शिक्षक वृंद,विद्यार्थी,मा. उपसरपंच आप्पाजी बोरुडे,संभाजी ब्रिगेड प्रदेश शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख,माऊली कण्हेरकर,अशोक बोरुडे आदी उपस्थित होते.