सर्व सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सैनिकहो तुमच्यासाठी.. महसूल पंधरवड्या अंतर्गत सर्व सैनिक,अर्ध्य सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-ना .विखे पाटील

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ७ ऑगस्ट २०२४ :
अहमदनगरच्या नागरी दळणवळण सुविधा सुलभ होण्यासाठी तिन उड्डाणपुलाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मेजर नीलकंठ उल्हारे व त्यांचे सहकारी रवींद्र इंगळे मेजर, रघुनाथ दांगट मेजर, अनिल सत्रे व लहू सुलाखे मेजर यांनी निवेदन देऊन सैनिक,अर्धसैनिकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी नामदार विखे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना महसूलच्या पंधरवडा मध्ये सैनिकहो तुमच्यासाठी या कार्यक्रमात सर्व सैनिकांचे प्रश्न तात्काळ मार्गे लावण्याबद्दल सुचित केले, व अस्वासित केले की महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये सर्व सैनिक, अर्धसैनिकांच्या आजपर्यंतच्या सर्व समस्या समाधानासाठी ५ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या महसूल पंधरवड्या अंतर्गत कामे मार्गे लावण्यात येतील.

संस्थेच्या वतीने सैनिक अर्धसैनिकांची मुख्य मागणी जमिनीच्या संबंधित अनेक तक्रारीचे निवारण करणे होते. याचप्रमाणे अर्धसैनिकांच्या अनेक मागण्या विचाराधीन आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मीटिंग आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या माजी सैनिकांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे होते. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्धसैनिकांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय स्थापन करावे व जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक शहर व ग्रामपंचायतच्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आजी-माजी सैनिकांचा रीतसर सर्व्हे करून मिळावा व त्यांची नोंदणी अर्धसैनिक कल्याण कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात असावी जेणेकरून त्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेता येतील अशा आशयाचे प्रमुख मुद्दे निवेदनात नमुद करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रा. स.आप्पासाहेब (बंडुनाना) सप्रे यांनी केले होते .

यावेळी उपस्थित आमदार संग्रामभैय्या जगताप, मा.आ.शिवाजी कर्डिले, नगरसेवक संपत बारस्कर, निखिल वारे ,डॉक्टर बोरुडे ,दत्ता सप्रे , राजेंद्र कातोरे,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब (बंडूनाना)सप्रे, महेश कांडेकर, संजय भोर, धनराज सप्रे बाळासाहेब मोरे, दीपक जाधव, दीपक बरे, नितीन खंडारे, आकाश कोल्हाळ, संकेत गुंजाळ, शुभम हजारे व रामभाऊ घाडगे आदि उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
86 %
6.7kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!