शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध..! प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचे सौ.अनुराधाताई नागवडे यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ८ ऑगस्ट २०२४ :
श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले. श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस होते.

यावेळी सौ. नागवडे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने जनहिताची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे विविध विकास कामे करणे शक्य होत आहे. नगरसेविका सौ. सीमाताई गोरे व श्री संतोष कोथिंबीर यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकास निधीमधून आज विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे ही प्रभागाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. यावेळी साळवनदेवी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, वेळू रोड, प्रोफेसर कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, पेडगाव रोड ते वेळू रोड रस्ता (शिवपार्वती सोसा) कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग नऊ मध्ये विविध ठिकाणी बाकडे बसविणे इत्यादी कामे प्रामुख्याने घेण्यात आलेली आहेत.

यावेळी श्रीगोंदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती मीराताई शिंदे , उपनगराध्यक्षा सौ. ज्योती खेडकर, माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके, नगरसेवक तथा गटनेते गणेश भोस, नगरसेवक समीर बोरा, निसार बेपारी, सतीश मखरे सर,सौ. सोनाली ताई घोडके, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शिंदे, तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे, शिवसेना युवा तालुकाप्रमुख निलेश गोरे, युवा शहर प्रमुख संदीप भोईटे, शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड, सोसायटीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे, माजी नगरसेवक राजू कोथिंबीर, चेअरमन सुधीर बापू कोथिंबिरे, जय माता ग्रुप चे अध्यक्ष लक्ष्मणराव कोथिंबिरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, युवा उद्योजक पांडुरंग गांजुरे , साळवनदेवी मातेचे पुजारी पाठक परिवार, सोसायटी संचालक पोपटराव कोथिंबीरे, राजू शेठ शिंदे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे, समीर कोथिंबीरे, शंकर साळुंखे, इंजि. वसिम भाई जमादार, शिवसेना तालुका संघटक गणेश गांजुरे तसेच साळवनदेवी रोड, प्रोफेसर कॉलनी, शिवपार्वती सोसायटी मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट : नगरसेविका सौ. सीमाताई गोरे व संतोष कोथिंबीर यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चांगला विकास केलेला आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.4 ° C
24.4 °
24.4 °
63 %
4.8kmh
89 %
Fri
35 °
Sat
36 °
Sun
35 °
Mon
35 °
Tue
33 °
error: Content is protected !!