लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ८ ऑगस्ट २०२४ :
येथील पंचायत समिती मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियोजन विभागाअंतर्गत तालुक्यात ८४ ग्रामपंचायती पैकी ४३ ग्राम रोजगार सेवकांना आमदार बबनराव पाचपुते व गटविकास अधिकारी राणीताई फराटे यांचे हस्ते सह.गटविकास अधिकारी मुकुंद पाटील, यांच्या नियोजनाखाली ऑनलाइन मनरेगा कामासाठी टॅबलेट चे वाटप करण्यात आले .
याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते यांनी ग्राम रोजगार सेवकांना ग्रामीण भागात रोजगार हमी योजना राबवून खेडी समृद्ध करण्याचा संदेश दिला.यावेळी युवा नेते प्रताप पाचपुते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दादासाहेब खराडे, तांत्रिक अधिकारी गणेश देशमुख, संपदा वाबळे, संग्राम पवार, ऑपरेटर जालिंदर खराडे समवेत पंचायत समिती चे विस्तार अधिकारी यादव, विस्तार अधिकारी हराळ मॅडम तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सर्व विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
तदनंतर ग्रामरोजगार सेवकांना टेबलेट हाताळणीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक स्वरूपाचे कामे सुरू आहेत ग्राम रोजगार सेवकांना जिओ टॉकिंग केलेल्या ठिकाणी मजुरांना बोलवून ऑनलाईन हजरी घ्यावी लागते यापूर्वी ही हजेरी वैयक्तिक फोनवर घ्यावा लागत होती काही वेळा नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्यामुळे मुजरांना काम असून हजेरी लागत नव्हती त्यामुळे त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळत नव्हता परंतु आता शासनाने दिलेल्या टॅबलेट मुळे कामावर येणाऱ्या मजुरांची नोंदणी करण्यासाठी व ऑनलाईन हजेरी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.टॅब वाटपा वेळी तालुक्यातील बहुसंख्य रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.