लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १४ ऑगस्ट २०२४ :
हर हर तिरंगा अभियान अंतर्गत किल्ले धर्मवीरगडावर (बहादूरगड) भारतीय स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अनन्वित अत्याचाराचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यावर ही ऐतिहासिक घटना ठरली आहे. तीन वर्षांपासून सातत्याने ही परंपरा कायम सुरू आहे. हर हर तिरंगा अभियान अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट रोजी किल्ले धर्मवीरगड पेडगाव येथे श्रीगोंदा तहसिलदार डॉ.क्षितिजा वाघमारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी उपस्थितांना “हर घर तिरंगा व भारतीय स्वातंत्र्याच्या” शुभेच्छा दिल्या.
यावेळी पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे, भगवान कणसे ,रोहिदास पवार, प्रतिभाताई झिटे, गणेश झिटे, शंभूव्याख्याते लक्ष्मण नाईकवाडी, शिवाजी नवले, यांसह अनेक ग्रामस्थ,जिल्हा परिषद प्राथ शाळा पेडगाव जुने व ज्ञानांकुर इंग्लिश स्कूल पेडगावचे शालेय विद्यार्थी उपस्थित होते. किल्ले धर्मवीरगडावर शिवकार्य, संवर्धन कार्य करणाऱ्या अनेक संस्थाचे प्रतिनिधी व पेडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अनेक स्वयंसेवक मावळे उपस्थित होते. राजेश इंगळे, दिगंबर भुजबळ, अजित दळवी, अमोल बडे, अजित लांडगे, वैशाली परहर, सोनवणे मॅडम उपस्थित होते.
राज्यपुरातत्त्व विभाग नाशिक , भारतीय पुरातत्व विभाग अहमदनगर. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, तहसील कार्यालय श्रीगोंदा यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व सहकार्य लाभले.