लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १५ ऑगस्ट २०२४ :
श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्राम विकास प्रतिष्ठान घारगाव संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव येथील चतुर्थ वर्षामध्ये शिकत असणाऱ्या उद्यानविद्या विभागामध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक भाजीपाला उत्पादन आणि मार्केटिंग या उपक्रमा अंतर्गत आज दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी पालेभाज्या मार्केटिंग केले.
विविध प्रकारचे भाजीपाला पिकांचे रोपे तयार करण्यापासून ते त्यानंचे व्यावसायिक पद्धतीने लागवड ते विक्री व्यवस्थापना पर्यंत सर्व कामे स्वतः करून उत्कृष्ठ पद्धतीने त्याचे कौशल्य आत्मसात केले ज्यामध्ये वांगे, मिरची, शिमला मिरची, कोबी, मेथी, कोथिंबीर, पालक उत्पादन घेतले. साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठरित्या व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न मिळवले.
यासाठी त्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर तसेच उद्यानविद्या विभागाचे प्रमुख प्रा. सई साळवे , प्रा. घोडके सर , प्रा. तापकीर सर, प्रा. वाळके सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा मांढरे, अंकिता गाडेकर, प्रतिक्षा भैलुमे, शिवानी जगताप, रोहन दैन, शुभम गायकवाड, शुभम ढोले, गौरव जगताप, वैभव गरड, अभय जांबळे, कृष्णा भोर, अभिषेक बोरनारे, ऋतिक जगताप, प्रसाद देशमुख आदी कृषिदुत आणि कृषिकन्या यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी श्री. दत्तकृपा शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे तसेच संस्थेचे रेजिस्टार कल्याण शिंदे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.