विजय मुथा आणि रमजान हवालदार यांची नागवडे कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी निवड

मुथा आणि हवालदार यांच्या निवडीमुळे अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १६ ऑगस्ट २०२४ :
विजय मुथा व रमजान हवालदार यांची सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या स्वीकृत तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी २०२२ मध्ये झाली. तदनंतर महाराष्ट्र सहकारी कायदा व कारखान्याच्या पोटनियमानुसार संचालक मंडळामध्ये प्रथम अनिल देवराम पाचपुते व बंडू अण्णासाहेब पंदरकर यांना दोन वर्षासाठी तज्ञ संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आले होते. दिनांक १० मे २०२४ रोजी त्यांची मुदत संपुष्टात आल्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजीचे मा. संचालक मंडळ सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार कारखान्याचे श्रीगोंदा येथील सभासद विजय मुथा व चिंभळा येथील सभासद रमजान हवालदार यांना तज्ञ संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आले.

मुथा आणि हवालदार यांच्या निवडीमुळे अल्पसंख्यांक समाजाला कारखाना संचालक मंडळात प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी अमृत शेठ पितळे व सुभाष शेठ गांधी यांना संचालक मंडळामध्ये काम करण्याची संधी दिली होती. परंतु हवालदार यांच्या निवडीने मुस्लिम समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व मिळालेले आहे. नागवडे कुटुंबीयांनी नेहमीच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली असल्यामुळे मुथा व हवालदार यांची निवड करण्यात आली आहे.

विजय मुथा व रमजान हवालदार यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष काका शिंदे, दूध संघाचे चेअरमन सोपानराव थिटे, कामगार युनियनचे सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!