श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश

कु. प्रज्ञा रामप्रकाश यादव हिने कुस्तीमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १७ ऑगस्ट २०२४ :
श्री स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. प्रज्ञा रामप्रकाश यादव हिने अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित पावसाळी क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये ४९ किलो वजन गट,१७ वर्षे वयोगटात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घन:शाम शेलार यांनी तिचा सत्कार करून तिला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कु.प्रज्ञा यादव हिला क्रीडा शिक्षक आर. एस जामदार व हनुमंत फंड सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रज्ञाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय आनंदकर सर, संस्थेचे निरीक्षक प्रा. विलास जाधव सर, प्रकाश निंभोरे, मोहनराव भिताडे, भाऊसाहेब खेतमाळीस,मुख्याध्यापक जामदार एस एन व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!