शेडगावच्या नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यात प्रथम

आयान बाबाजान तांडेल कुस्तीच्या ग्रीको (रोमन) व फ्रीस्टाइल या दोन्ही क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १८ ऑगस्ट २०२४ :
अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती व श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या वतीने घेतलेल्या पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये शेडगावच्या नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ११ वी कला शाखेचा विद्यार्थी आयान बाबाजान तांडेल रा.पेडगाव तालुका श्रीगोंदा याने वयोगट १७ वर्ष, वजन गट ६० किलो. कुस्तीच्या ग्रीको (रोमन) व फ्रीस्टाइल या दोन्ही क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याची अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आपल्या चपळ शरीर यष्टीने व अत्यंत चतुराईने प्रतिस्पर्धी खेळाडू वर योग्य रीतीने डाव टाकत आयान याने सहजरित्या विजय मिळवला. या विजयाबद्दल त्याचा नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेडगाव ग्रामस्थ यांनी सत्कार करून हार्दिक असे अभिनंदन केले.

जिल्हास्तरावर होणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये सुद्धा विजय संपादन करून विभाग व राज्यस्तरावर खेळण्याचा निश्चय यावेळी आयान याने केला या विजयात आयान याला क्रीडा शिक्षक प्रा. राजाराम वगरे व सदानंद हाके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आयान बाबाजान तांडेल हा सध्या कुस्ती सम्राट असलम काझी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा कुर्डूवाडी येथे सराव करीत आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!