श्रीगोंद्यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजन; विध्यार्थ्यांसाठी नोकरीच्या सुवर्ण संधी

शुक्रवार २३ ऑगस्ट पासून मुलाखत पूर्ण प्रशिक्षण; रोजगार मेळाव्यामध्ये १८ कंपन्या व बँका सहभागी होणार

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २२ ऑगस्ट २०२४ :
आज छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे सौ अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व मुलाखत ट्रेनिंग आणि भव्य रोजगार मेळवा २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की; श्रीगोंदा आणि परिसरातील सुशिक्षित होतकरू पूर्व गरजू पदवी आणि पदवीतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली यांच्यासाठी शुक्रवारी दिनांक २३ ऑगस्ट २०२४ ते २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत दररोज सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत पूर्व मुलाखत तयारी मोफत प्रशिक्षण आणि शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी भव्य रोजगार मेळावा सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे.

पुढे बोलताना नागवडे आणखी म्हणाले की; पुणे परिसरातील १५ पेक्षा जास्त विविध नामांकित बँकिंग/ फायनान्स इंडस्ट्री मधील ४०० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अगोदर होणाऱ्या ट्रेनिंग मधून विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीला सामोरे जाण्याअगोदर आत्मविश्वास निर्माण होणार आहे. असे देखील नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

अधिक माहिती देताना नागवडे आणखी पुढे म्हणाले की पुणे परिसरातील पिंपरी चिंचवड; शिवाजीनगर, पुणे स्टेशन परिसर, विमान नगर, मगरपट्टा सिटी, बंडगार्डन, येरवडा परिसर आणि इतर सर्व पुणे विभाग हे कार्यक्षेत्र नोकरीच्या ठिकाणी असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता बीए, बी कॉम, बीएससी, बीसीए, बीसीएस, डिप्लोमा, एम कॉम, एम एससी आदी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पदवीत्तर मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यात सामील होऊ शकतात. असे देखील नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास १८ कंपन्या व बँका सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने नोकरीचे ठिकाण व कंपनी यादी पुढीलप्रमाणे : किवीस कॉर्पोरेशन लिमिटेड, कॅलिबर सर्विसेस लिमिटेड, जेनियस प्रायव्हेट लिमिटेड, क्यू कनेक्ट लिमिटेड, दुआॢझ एच आर सर्विसेस, ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड, आर्मैका प्रायव्हेट लिमिटेड, अल्ट्रा स्टेट लिमिटेड, सॉफ्टजन लिमिटेड, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, आवास फायनान्स लिमिटेड, टेक महिंद्रा, डब्ल्यू एन एस लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, माइस्ट्रोरियल टेक, आय प्रोसेस लिमिटेड इत्यादी कंपन्या व बँका सहभागी होणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.

नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी त्या अगोदर दिलेल्या गूगल फॉर्म लिंक वर क्लिक करून किंवा क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी पूर्ण करून घ्यावी आणि शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता कॉलेजमध्ये ऑफलाईन नोंदणी करता महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यान सहा दिवस ट्रेनिंग आणि सातव्या दिवशी रोजगार मेळावा असे नियोजन आहे. या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त गरजू आणि होतकरू मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अनुराधाताई राजेंद्र नागवडे विचारमंच तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

या आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, विश्वनाथ गिरमकर, मारुती पाचपुते, योगेश भोईटे, विठ्ठल जंगले, भाऊसाहेब नेटके, भाऊसाहेब बरकडे संदीप औटी, डी आर काकडे, विजय मुथा, सौ सुरेखा लकडे, प्राचार्य डॉ. सतीषचंद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.5 ° C
38.5 °
38.5 °
13 %
3.9kmh
0 %
Fri
39 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
40 °
Tue
41 °
error: Content is protected !!