लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २४ ऑगस्ट २०२४ :
बबनराव पाचपुते यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे श्रीगोंदा तालुका व शहर युवा मोर्चा व फादर बॉडी भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी राहुल राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार बबनराव पाचपुते यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष यांच्या सहीचे नियुक्तीपत्र भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते राहुल राऊत यांना देण्यात आले.
यावेळी बबनराव पाचपुते व युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी बोलताना सांगितले की केंद्र सरकारने व राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांसाठी ज्या योजना राबविण्यात येत आहेत त्या सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवा तसेच भारतीय जनता पार्टीचे संघटन कौशल्य दाखवून आपला ठसा उमटवला पाहीजे असं ही सांगितले यावेळी सर्व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नूतन युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल राऊत यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांचा आपण समाजामध्ये प्रचार व प्रसार करण्याची ग्वाही दिली तसेच संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे आश्वासन दिले. नियुक्ती पत्र देताना गणेश काळे, ज्येष्ठ नेते उत्तम राऊत, पिंटू भाऊ सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी, मिलिंद दरेकर, संतोष दरेकर, जालिंदर बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नूतन युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल राऊत यांचे सर्वांनी अभिनंदन केले.