लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २४ ऑगस्ट २०२४ :
सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांनी बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षणासाठी सिन्नर येथे सप्ताहात केलेल्या विधानानंतर त्याच्यावर राज्यात चुकीचे पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले.रामगिरी महाराज यांचे समर्थनार्थ तसेच राज्यासह देशातील माहिला अत्याचाराच्या घटनेत आरोपींना कडक शासन करण्याची मागणीचे निवेदन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक याना श्रीगोंद्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिले.
शहरातील बाजार तळ येथील मारुतीच्या मंदिरात आरती करण्यात आली .यावेळी हभप भूषण महाराज महापुरुष उपस्थित होते.यानंतर तालुक्यातील संतांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या आवारात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत निवेदन दिले.महंत रामगिरी यांच समर्थन तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पुरावे तसेच यापूर्वी जे साहित्य तेसच व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याची माहिती या निवेदनात होती.तसेच बांगलादेश मधील हिंदुना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करावी.
तसेच पश्चिम बंगाल, बदलापूर मधील माहिला अत्याचाराच्या घेटनेतील आरोपीना फाशी व्हावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी हभप बाबर महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले.हिंदू धर्माचे आचरण करताना सर्वांनी जागृत रहावे तसेच समाज जागृत राहावा असे आवाहन केले. यानंतर हभप माऊली महाराज म्हस्के, ढोरजकर महाराज,बाबर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारकरी प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद,बजरंग दल ,संघ परिवारासह शिव प्रतिष्ठान आदि संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.