लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२४ :
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची ५९ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर अधिमंडळ वार्षिक सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस यांनी दिली. भोस यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या मंगळवार दिनांक २७ रोजी होणाऱ्या ५९ व्या वार्षिक आधिमंडळ सभेची नोटीस व अहवाल सभासदांना पाठविण्यात आलेला आहे.
सदर विषय पत्रिकेनुसार त्या विषयवार कामकाज व चर्चा सभेमध्ये होणार आहे. तरी सदर सभेस सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केले आहे.