लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२४ :
तालुक्यातील मांडवगण येथील अमोल बोरुडे यांनी सध्या महिलांवरील आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारा बाबत त्यांच मत स्पष्ट केल त्या वेळी ते म्हणाले की मंत्र्यांची अब्रू कोणी लुटणार आहे का? मग त्यांना कशाला हवा एव्हढा पोलिस ताफा वाहना करिता एव्हढा इंधन खर्च आज आपल्या महाराष्ट्रात खरी सुरक्षेची गरज महिलांना आहे त्या करिता यांची सुरक्षा यंत्रणा काढून घेऊन शाळा, महाविद्यालय, लेडीज हॉस्टेल्स, सेन्सिटिव्ह एरिया अशा ठिकाणी पेट्रोलिंग करिता पोलिस तैनात करायला हवेत विनाकारण पोलिस बळाचा नको त्या ठिकाणी आपले शासन वापर करत आहे सध्या निर्भया स्कॉड कार्यरत आहे त्यात आणखीन भर टाकण्याची गरज आहे. पोलिसांनी शाळा महाविद्यालयात जाऊन संकट वेळी काय करावे या सारखे अवेरनेस सेमिनार घ्यायला हवेत.
श्रीगोंदा तालुक्यात शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अशातच टवाळखोर सुद्धा टोळीने रोड ला आणि बस स्थानका लगत बसलेली दिसून येतात. दादागिरी, हाणामारी, माझा हा नेता तो दादा करताना दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून कॉलेज, शाळा भरण्याची वेळ आणि सुटण्याची वेळेत पोलिसांनी पेट्रोलिंग करायला हवी.अस ही होताना दिसत आहे की या टवाळ खोरांचे पन राजकीय आधारस्तंभ आहेत. पोलिस प्रशासनाने अशा आधार स्तंभाना नागड कराव. अत्याचार होऊन गेल्या नंतर कारवाई करण्या पेक्षा अगोदर काळजी घेण गरजेचं आहे.