लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २५ ऑगस्ट २०२४ :
काष्टी – सिध्दटेक रस्त्यावरील पेडगाव येथील सरस्वती नदीवरील पुलाचे काम सुरू असुन बाजूने काढलेला कच्चा बायपास रस्ता गेल्या पाच दिवसांपुर्वी पावसांच्या पाण्यामुळे वाहुण गेल्याने तेंव्हापासून वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे वाडया वास्त्यावरील नागरिकांना दळणवळण पूर्ण ठप्प झाले आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांच्या दुर्लक्षतेमुळे सामान्य नागरिकांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबतीत प्रशासनाने त्वरित लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी.
गेल्या अनेक वर्षांपासून या सरस्वती नदीवरील पूल बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी याचा पाठपुरावा करून कामाला मंजूरी मिळाली
परंतु ऐन पावसाळ्याच्या दिवसात संबंधित ठेकेदाराने जुने पुल खोदकाम करून या जागेवर जवळपास पंधरा फुटा चा खड्डा खोदला व बाजूने काढलेल्या बायपास साठी योग्य नियोजन केले नाही परिणामी पावसाच्या पाण्यात बायपास वाहून गेला. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांच्या अधिकाऱ्यांनी याकडे तर पाठच फिरवल्यामुळे साहेब उघडा डोळे बघा नीट अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
आसपास च्या वाडया वस्त्या मधील मोहीते वस्ती, खराडे वस्ती, काझी वस्ती, हवालदार वस्ती, ओगले नगर येथील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे तसेच स्थानिक शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून या पुलाच्या बायपासचे काम लवकरात लवकर करावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे.