लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २७ ऑगस्ट २०२४ :
दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात फिर्यादी हे त्यांचे घरी असतांना त्यांचेच गावातील आरोपी दत्ता बाळु शिंदे, वय ३० वर्ष, ता. श्रीगोंदा हा फिर्यादी यांचे घरी दारुचे नशेत आला व आरडा ओरड करुन त्याने त्याच्या स्वतः च्या अंगावरील कपडे घराच्या पढवीत काढुन फिर्यादी यांचे घरात प्रवेश करुन अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. या घटनेचा तपास करत श्रीगोंदा पोलिसांनी एका तसाच आरोपीस ताब्यात घेतले.
सविस्तर माहिती अशी की घटना घडल्या नंतर फिर्यादी यांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री फिर्याद दिल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३३३, ३४ सह बालाकांचे लैगिंक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाले नंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोनि. किरण शिंदे यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेवुन तात्काळ आरोपीस अटक करण्यासाठी दोन पथके रवाना करुन आरोपीस तात्काळ अटक करणेचे आदेश दिले पोलीसांनी सदर घटनेतील आरोपी याचा भावडी व कोकणगाव परिसरात शोध घेत असतांना नमुद आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. किरण शिंदे, पोसई. संपत कन्हेरे, पोना गोकुल इंगवले
पोना./ संग्राम जाधव, पोकॉ./ संदिप राऊत, पोकॉ. अरुण पवार पोकॉ. संदिप आजबे, पोकॉ. आनंद मैड यांनी केली आहे. सदर आरोपीस मा.न्यायालय श्रीगोंदा यांचे समक्ष हजर केले असुन पुढील तपास चालु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक अहमदनगर आणि अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. संपत कन्हेरे हे करीत आहेत.