लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २७ ऑगस्ट २०२४ :
मुंबई, भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालया अंतर्गत सर्वात मोठी स्वायत्त संस्था असलेल्या नेहरू युवा केंद्र दिल्ली संलग्न ह्यूमन योगा फाउंडेशन वरळी मुंबई येथील संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध गायक, पद्मभूषण उदित नारायण यांच्या हस्ते व दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिपकराजे शिर्के यांना “दि सुपर ह्यूमन एक्सलेंस आवार्ड”- २०२४ पुरस्कार, वरळी मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
प्रशासकीय देशसेवा, सामाजिक कार्य, शैक्षणिक संस्था व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत, कारगिल युद्धात सहभागी असलेले,माजी सैनिक अधिकारी, माजी सैनिक लीडर, सैनिक घडवणाऱ्या सैनिकी प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांना भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालया अंतर्गत सर्वात मोठी स्वायत्त संस्था असलेल्या नेहरू युवा केंद्र, दिल्ली संस्थेचा मानाचा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आला. दिपकराजे शिर्के यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून अभिनदंनाचा वर्षाव होत आहे.