लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २८ ऑगस्ट २०२४ :
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये २६ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या भरती प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त होत आहे. स्थानिकांनी यामध्ये आर्थिक तडजोडी झाल्याचा संशय व्यक्त केला असून, ऑफलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्यामुळे शासकीय आदेशांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून खुलासा करण्यात यावा, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे.
या बाबींमध्ये पारदर्शी कारभार न झाल्यास ४ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष संजय रणसिंग व उपाध्यक्ष पवन रणदिवे यांनी दिला आहे. सदरील आंदोलन ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.