पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या प्रखर लेखणीतून सर्वसामान्यांना सतत न्याय दिला -प्राचार्य प्रशांत भोईटे

बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी पॉलिटेक्निकच्या वतीने कुरूमक यांचा सन्मान

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३० ऑगस्ट २०२४ : तालुक्यातील एक अभ्यास व दूरदृष्टी लाभलेले जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या प्रखर लेखणीतून सर्वसामान्यांना सतत न्याय देण्याचे काम केले असे गौरदगार प्राचार्य प्रशांत भोईटे सर यांनी काढले. श्रीगोंदा तालुक्यातील एक अभ्यासू व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची नुकतीच श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी व जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याने त्यांचा बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी पॉलिटेक्निकच्या वतीने यथोचित प्राचार्य प्रशांत भोईटे सर यांनी सन्मान केला.

यावेळी आपल्या गौरवोद्गारपर भाषणात प्राचार्य भोईटे सर बोलताना म्हणाले की; पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतून सर्वसामान्य नागरिक गुणवंत विद्यार्थी विविध विद्यालय व महाविद्यालय उपक्रम व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नावर वास्तव्याला धरून प्रखर व निर्भीडपणे लिखाण करून एक आपली पत्रकारितेचा सामाजिक बांधिलकीचा वसा उत्तम प्रकारे जोपासण्याचे काम केले आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान लाभत आहे. तालुक्यातील कोणताही घटनाक्रम असो वास्तवपणे मांडणी करून बातमीच्या स्वरूपात प्रथमपणे माहिती विशद करण्याचे काम पत्रकार कुरुमकर यांच्याकडून प्रभावीपणे होताना दिसते. एक अभ्यासू व दूरदृष्टी लाभलेले पत्रकार कुरुमकर यांनी निश्चितच तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी त्यांचे भरीव योगदान सर्वसामान्यांसाठी एक प्रेरणादायी बाब आहे.

पुढे बोलताना प्राचार्य भोईटे यावेळी म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांनी पत्रकारितेत व्यवसाय म्हणून कधीच पत्रकारितेचे अश्र वापरले नाही. समाजहित व सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे तालुक्यातील विविध प्रश्नांची मांडणी केली. त्यातून अनेक प्रश्नांना वाचाही फुटली. रस्ते, वीज, पाणी इत्यादी प्रश्नावर त्यांचे लिखाण सर्वसामान्यांसाठी ही एक बौद्धिक कौशल्याची पर्वणी ठरली. त्यातून जनतेलाही मोठा दिलासा मिळत आहे असे गौरवोद्गार प्राचार्य भोईटे यांनी व्यक्त करत त्यांची पत्रकार संघावर निवड एक त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावतीच म्हणावी लागेल, असे सांगून प्राचार्य श्री भोईटे यांनी पत्रकार कुरुमकर यांच्या कार्यकर्तुत्वावर स्तुतीसुमणे वाहिली.

यावेळी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी इंदिरा गांधी पॉलिटेक्निकच्या यशस्वी व उत्तम प्रकारे ज्ञानदानाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा देत पॉलिटेक्निकलच्या वतीने सन्मान केल्याबद्दल प्राचार्य प्रशांतजी भोईटे सर व त्यांच्या स्टाफचे आभार व्यक्त केले. यावेळी मेकॅनिक विभाग प्रमुख मज्जित हवालदार; कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रमोद इथापे, सिव्हिल विभाग प्रमुख संदीप नातू सर, बिपिन इथापे; श्री अनिल महानोर आदी उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.3 ° C
24.3 °
24.3 °
76 %
7.7kmh
100 %
Wed
24 °
Thu
26 °
Fri
24 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!