लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३० ऑगस्ट २०२४ :
काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चांगले यश मिळवले. त्यामध्ये १७ वर्षे वयोगटात ७१ किलो वजनी गटात राजवर्धन खरात,१९ वर्ष वयोगटात ७४ किलो वजनी गटात समीर शेख तर १९ वर्षे वयोगटात ९७ किलो वजनी गटात साहिल देवकर या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत रौप्यपदक मिळवले.
त्याबद्द खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री आमदार बबनराव पाचपुते,परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते,मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.प्रतापसिंह पाचपुते, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.अनिल पुंड, अकॅडमी डायरेक्टर सौ.इंद्रायणी पाचपुते,अकॅडमी डेप्युटी डायरेक्टर प्रा. संजीव कदम पाटील, प्राचार्य डॉ.संजीवन महाडिक,प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, प्रा.डॉ.सुदर्शन गिरमकर, प्राचार्य डॉ. रमेश शिंदे,प्राचार्य डॉ.पांडुरंग इथापे, प्राचार्या डॉ.सुवर्णा निर्मळ,प्राचार्य जेम्स मेनन, यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.या खेळाडूंला प्रा.रवींद्र काळाने, प्रा.पै.रोहन रंधवे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वच स्तरातून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.