लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३१ ऑगस्ट २०२४ :
श्रीगोंदा पोलीस शहरात पेट्रोलिंग करीत असताना दिनांक-२७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास श्रीगोंदा बस स्टँण्ड समोर एक व्यक्ती विना नंबर प्लेट गाडी चालवताना दिसल्याने त्यास श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोकाँ संदिप राउत व पोकाँ पवार यांनी थांबण्याचा इशारा दिला असता तो पळुन जात असल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ अनिल मोतीराम आल्हाट रा. वेळुरोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा असे सांगितले व गाडी चोरी केलेली आहे. तसेच इतर गाड्याही चोरी केल्या असुन त्या मोटार सायकली माझे ओळखीचे तसेच मित्र यांना विकल्या आहेत असे सांगितले.
सदर तपास करीत असताना आरोपीचे साथीदार १) सत्यवान दादा जाधव रा. अजनुज ता. श्रीगोंदा २) विशाल प्रकाश रंधवे रा. शिवाजीनगर ता.श्रीगोंदा यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्याच्याकडुन श्रीगोंदा पोलीस यांनी हिरो होंडा स्प्लेंडर, युनिकॉर्न, यमाहा आर एक्स १००, इत्यादी कंपनीच्या मोटाकसायकल हस्तगत केल्या आहेत.
सदर गुन्ह्यात आरोपी १) सोन्या उर्फ अनिल मोतीराम आल्हाट रा. वेळ रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा २) सत्यवान दादा जाधव रा. अजनुज ता. श्रीगोंदा ३) विशाल प्रकाश रंधवे रा. शिवाजीनगर ता.श्रीगोंदा यांना अटक करुन सदर हस्तगत मोटारसायकल यांचा पंचासमक्ष पंचनामा करुन त्यानंतर आरोपी यांना मा. न्यायालय श्रीगोंदा यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने दिनांक- ०३ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ मुकेशकुमार बडे हे करीत आहेत. सदर हस्तगत मोटारसायकल यांचे मालकांचा शोध घेण्याचे काम चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, अहमदनगर राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक, अहमदनगर प्रशांत खैरे साहेब, गणेश उगले साहेब, कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शना खाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोसई संपत कन्हेरे, पोना इंगावले, पोकाँ अरुण पवार, आनंद मैड, संभाजी गर्जे, संदीप राउत, संदीप शिरसाठ, संदीप आजबे, संदीप जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर नेमणुकीचे पोकाँ नितीन शिंदे पोकों राहुल गुंडु यांनी केली आहे.