लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३१ ऑगस्ट २०२४ :
दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा येथील कु. प्रज्ञा रामप्रकाश यादव या खेळाडूने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड
प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक घन:शाम अण्णा शेलार यांनी तिचा सत्कार करून तिला विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कु.प्रज्ञा यादव हिला क्रीडा शिक्षक आर. एस जामदार व हनुमंत फंड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रज्ञाने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार,व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय आनंदकर सर, संस्थेचे निरीक्षक विलासराव जाधव सर, प्रकाश निंभोरे, अजीमभाई जकाते, मोहनराव भिंताडे साहेब, भाऊसाहेब खेतमाळीस, मुख्याध्यापक जामदार एस एन व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.