लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २ सप्टेंबर २०२४ :
तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड पक्षाकडून रेशन धारकांना देण्यात येणारा तांदूळ प्लॅस्टिक युक्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत तहसील येथे निवेदनाद्वारे कळविण्यात आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिधापत्रिका धारकांना देण्यात येणारे तांदूळ हे प्लास्टिक युक्त असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. सदर तांदूळ हे गोरगरीब जनता दररोज खात आहे. हे तांदूळ म्हणजे एक प्रकारचे विष असून जनतेच्याआरोग्याला धोकादायक असून शासनाच्या सशक्त भारत योजनेला तडा देणारे आहे. यामुळे गोरगरीब जनतेचा शासनाकडून जाणीवपूर्वक बळी घेतला जात आहे. असं श्रीगोंदा संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून हे तांदूळ वितरण तात्काळ थांबवण्यात यावे. त्याचबरोबर सर्व दुकानदार व गोडाऊन यांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी दिलीप आबा वाळुंज जिल्हा उपाध्यक्ष, इंजि. शामभाऊ जरे तालुकाध्यक्ष, गोरख तात्या घोडके तालुका कार्याध्यक्ष, रवींद्र महांडूळे तालुका उपाध्यक्ष, उत्तम घोगरे तालुका संघटक, आरडे मेजर, उत्तम घोगरे, गणेश महंडुळे, रोहीदास गोसावी, सुहास होले ई. पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याविषयात तातडीने चौकशी करून कारवाई करू असे नायब तहसीलदार बन साहेब यांच्याकडून सांगण्यात आले.
चौकट
प्लास्टिक युक्त तांदळाचा प्रकार अतिशय घातकी असून यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. लवकरात लवकर चौकशी करून कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड या विषयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल – इंजि. शामभाऊ जरे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पक्ष