माजीविद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने १९ वर्षांनंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा

श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या २००४ - २००५ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी केले मेळाव्याचे आयोजन

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ४ सप्टेंबर २०२४ :
श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या २००४ – २००५ या वर्षाच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते जवळपास १९ वर्षांत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा रविवारी विद्यालयच्या माजी मुख्यद्यापिका सौ.दमयंती लगड मॅडम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

श्री व्यंकनाथ विद्यालय या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. दुपारी ४ वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. शरद भोसले, अनिल मदने, रविंद्र चव्हाण, शक्ती मडके, जयवंत खेडेकर आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हा माजी विध्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी “सध्या माजी विद्यार्थी काय करतात “या विषवावर चर्चा करण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विध्यार्थ्यांनी वेक्त केली. यावेळी माजी विद्यार्थी विजय पांढरे आणि शिक्षक -रासकर सर, साळवे सर आणि ससाणे मॅडम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.

या माजी विध्यार्थी मेळाव्याला शारदा राऊत, सीमा काकडे, चेतना पवार, प्रतिमा बळे, संगीता शिंदे,सविता भोसले यांच्या सह आशुतोष पाचपुते, बंडू यादव, सतिष कोळपे, रवी शिंदे, मछिंद्र मडके, शैलेश पांडव, राहुल पवार, तोफीक सय्यद, काका कऱ्हे,सचिन जगताप, पांडुरंग पुराणे, बबन गोरखे, प्रशांत जाधव, राहुल काकडे, गणेश ढगे, परशुराम खलाटे, गणेश साळवे, यशवंत मडके आदी विविध क्षेत्रात काम करणारे माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!