लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ७ सप्टेंबर २०२४ :
शुक्रवार दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा शहरातील अनन्या हॉटेल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. सदर सन्मान सोहळा महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रायव्हेट लिमिटेड/मारुती सुझुकी डीलर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ५१ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र, विस्तार अधिकारी नीलकंठ बोरुडे, उत्तरेश्वर मोहोळकर, दत्तात्रय शिंदे, बबन गाडेकर, सचिन हिंगणे व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. तसेच भाजपचे युवा नेते विक्रमसिहं पाचपुते, बापू गोरे, संतोष क्षिरसागर यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. नेक्सा महालक्ष्मीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सत्यजित मच्छिंद्र, नीलकंठ बोरुडे, उत्तरेश्वर मोहोळकर, बबन गाडेकर, विक्रमसिहं पाचपुते, झेंडे मॅडम आणि नेक्सा शोरूमचे मॅनेजर गणेश शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांचा शाल, सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिन हिंगणे उपस्थित होते तर गीता सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
महालक्ष्मी ऑटोमोटिव्हस प्रायव्हेट लिमिटेड आणि नेक्सा महालक्ष्मीच्या वतीने असिस्टंट सेल मॅनेजर सचिन हिंगणे, एसआरएम गणेश शिंदे, एसआरएम महेश देशपांडे, क्षितिज शितोळे, अय्याज शेख, रवी शिंदे, अक्षय चव्हाण, तुषार दुर्गुडे, नूतन महानवर, प्रीती जगताप आणि सचिन जंगले हे उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी आपल्या भाषणात कंपनीला शुभेच्छा देतानाच, कंपनीने CSR फंडाचा वापर करून दुर्लक्षित आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही केली.
युवा नेते विक्रमसिहं पाचपुते यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन केले व नेक्सा महालक्ष्मीचे आभार मानले. त्यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या गेल्या १५ वर्षातील प्रगतीचा उल्लेख करत विकास कामे, रस्ते, वीज आणि विविध योजनांच्या माध्यमातून झालेल्या बदलांची माहिती दिली आणि नेक्सा महालक्ष्मीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी झेंडे मॅडम यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने नेक्सा महालक्ष्मी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तर नेक्सा महालक्ष्मीच्या वतीने एस आर एम गणेश शिंदे यांनी उपस्थित शिक्षकांचे व मान्यवरांचे आभार मानले.