लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.११ सप्टेंबर २०२४ :
तालुक्यातील कुकडी विश्रामगृह येथे राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष गंगाराम मचे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रधान महासचिव रफिक इनामदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या निवड प्रक्रिये साठी जिल्ह्यातील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अहमदनगर दक्षिण मधील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये ॲड.दत्तात्रय अण्णासाहेब भोईटे जिल्हा उपाध्यक्ष, विजय गुलाबराव शिंदे जिल्हा महासचिव, ज्ञानदेव नामदेव काळे पा. जिल्हा सचिव, हिना समीर शेख जिल्हाध्यक्ष महिला आघाडी या पदांसाठी कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विजय कंडारे, प्रधान महासचिव रफिक इनामदार, महासचिव इसुफ खान, जिल्हाध्यक्ष गंगाराम मचे, युवा नेते गोपाल घनवट यांनी शुभेच्छा दिल्या.