टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.११सप्टेंबर २०२२ : गेली ८-१० दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामध्ये आज झालेल्या मोठ्या पावसामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या शेजारील कुळधरण – राशीन रोडवरील ओढ्याला पूर आल्यामुळे रस्ता बंद झाला आहे मोठी रहदारी असणाऱ्या ह्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याच प्रमाणे कुळधरण-धालवडी हा रस्ता सुध्दा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
कुळधरण वरून राशीन कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने सतत दळणवळण असलेला हा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे ओढयाला आलेल्या पुरात पूल पाण्याखाली जाऊन आसपासच्या गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचा शेजारील गावापासून संपर्क तुटला आहे. दळणवळण पूर्णपणे ठप्प आहे.नागरिकांमधून कायम स्वरूपी उपाय योजनेची मागणी होत आहे.
स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)