लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १७ सप्टेंबर २०२४ :
बेलवंडी गावचे सरपंच ऋषिकेश अण्णासाहेब शेलार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब शेलार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह भ प बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते सोमवार दि. १६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एमडी शिंदे होते.
आता कुठल्याही परिस्थितीत मी आगामी विधानसभा लढवणारच आहे त्यामुळे लोकांनी मनात शंका आणण्याचे कारण नाही. मी प्रत्येक पक्षाकडे जाऊन आलो आहे चिन्ह ही फायनल झाले आहे पण आत्ता सांगू शकत नाही. मागच्या निवडणुकी वेळी माझ्याकडील एक एक माणसं एनवेळी कमी होत गेली परंतु आता तसं होणार नाही पूर्ण नियोजन करूनच मैदानात उतरणार आहे. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्यावेळी कुकडी विसापूर धरण पाणी प्रश्न रोजगाराचा प्रश्न समोर येतो या प्रश्नांवर कितीतरी आमदार श्रीगोंद्यात झाले परंतु प्रश्न काही सुटले नाहीत, आमच्याकडे राजकीय वारसा नाही कारखाना नाही तसेच शिक्षण संस्था ही नाहीत मी गरीब माणूस आहे माझ्याकडे कसलाही व्याप नाही त्यामुळे मी तुमचे कामे करू शकतो फक्त एकदा संधी द्या तालुक्याचे सोनं करून दाखवेल. संपूर्ण तालुका दौरा करून ना भूतो ना भविष्य असा भव्य मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचं अण्णासाहेब शेलार यांनी यावेळी सांगितले.
ज्यावेळी विधानसभा निवडणुका येतात त्या प्रत्येक वेळी त्याच त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते जनतेची दिशाभूल केली जाते शेजारील तालुके पाहिले तर त्या ठिकाणचे प्रश्न जवळपास सुटलेले आहेत आर्थिक सुबत्ता आली आहे रोजगाराचे प्रश्न सुटले आहेत दळणवळण वाढले आहे परंतु श्रीगोंदा तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसे आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हातात घेण्याचे ठरविले आहे त्यासाठी आपली साथ हवी आहे असे ऋषिकेश शेलार यांनी बोलताना सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी साजन पाचपुते, अनिल ठवाळ, एमडी शिंदे, शरद जमदाडे, कांतीलाल कोकाटे, संतोष रोडे, सोमनाथ घाडगे, सुभाष काळाणे, साहेबराव रासकर,वाल्मिक खेडकर, वामन भदे, रामराव खामकर, राजू गोरे, असिफ शेख, ओंकार शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
सर्वसामान्य कार्यकर्तासाठी वेळ आली तर दोन पावले मागे जाण्याची माझी तयारी असते, आपल्या दोघांच्याही वडिलांचे तालुक्यात मोठे काम आहे. तुझ्या सारख्या निर्व्यसनी चांगल्या विचारांच्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे ऋषिकेश तुला कधीही माझी मदत लागली तर मी मदतीला उभा राहील – साजन पाचपुते