लोकक्रांती
श्रीगोंदा,दि. १७ सप्टेंबर २०२४ :
तालुक्यातून गेलेल्या महामार्ग क्रमांक ५४८ डी या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे सोमवार दि. १६ रोजी दुपारी ३:३० वा.च्या सुमारास तालुक्यातील आढळगाव शिवारामध्ये आढळगाव ते श्रीगोंदा रस्त्यावर चारी नं. १२ जवळ मोटारसायकल क्रमांक एम एच २३ बी.ए.१९११ या दुचाकी वरून अजिनाथ लक्ष्मण मासाळकर रा. आष्टा ता. आष्टी जि. बीड यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.
दत्तात्रय भगवान मासाळकर वय 33 वर्षं रा. आष्टा हरिनारायण ता. आष्टी जि. बिड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात वाहन चालकावर गु.रजि.नं.व कलम 849/2024भा.न्या.सं.कलम106,281,125(a),125(b)MVact184, 134(a)(b) 177 प्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वा.च्या सुमारास तालुक्यातील आढळगाव शिवारामध्ये आढळगाव ते श्रीगोंदा रस्त्यावर चारी नं. १२ जवळ मोटारसायकल क्रमांक एम एच २३ बी.ए.१९११ या दुचाकी वरून अजिनाथ लक्ष्मण मासाळकर रा. आष्टा ता. आष्टी जि. बीड यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ राहुल शिंदे, आप्पा तरटे, पोकॉ. संदीप आजबे, अरुण पवार अपघात स्थळी जाऊन पुढील कार्यवाही केली.