लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १७ सप्टेंबर २०२४ :
श्रीगोंदा पोलिसांना तांत्रिक तपास व गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाल्याने सदर आरोपींना संभाजीनगर येथील वेगवेगळया ठिकाणाहून सापळा रचुन त्यांना अटक केले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. तसेच त्यांचेकडून पाच लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी इको व्हॅन जप्त करण्यात आली असून त्यांना दि.१६ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांना आज दि. १७ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
सविस्तर माहिती अशी की पैशांसाठी खोटे लग्न करुन फसवणुक करणारे सराईत आरोपी यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 0838/2024 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 318 ( 4 ),303 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयातील आरोपी 1) नवरीचा बनावट रोल करणारी एक महीला 2) नवरीच्या बहिणीचा रोल करणारी एक महीला 3) नवरीच्या दाजीचा रोल करणारा व्यक्ती विठठल किसन पवार वय-37 वर्षे रा. महालक्ष्मी खेडा, पो. सावखेडा जि. संभाजीनगर 4) नवरीच्या काकाचा रोल करणारा व्यक्ती ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे वय 45 वर्षे रा. धुपखेडा ता. पैठण जि. संभाजीनगर यांचा शोध घेत असताना संभाजीनगर येथील वेगवेगळया ठिकाणाहून सापळा रचुन त्यांना अटक केले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध
सुरु आहे.
मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, व मा. पोलीस निरीक्षक किरण शिंदे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांचे पथकामधील पोना गोकुळ इंगावले, पोकों संदिप शिरसाठ, पोकॉ आनंद मैड, पोकॉ संदिप राऊत व मपोकों प्रमिला उबाळे यांनी तपास केला. सदर गुन्हयाचे तपासात दक्षिण मोबाईल सेल नेमणुकीचे पोकॉ राहुल गुंडु व पोकॉ नितीन शिंदे यांची मदत मिळाली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.