श्रीगोंद्यात पारगाव येथील अपघातात तीन ठार दोन जखमी

श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या आंतराने दोन अपघात

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २१ सप्टेंबर २०२४ :
शुक्रवारी रात्री श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर दोन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाले,एकाच रस्त्यावर एक ते दीड तासाच्या आंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या विचित्र अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दोन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाला नगर येथे तर दुसऱ्याला दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात विकास दादासाहेब वाकळे वय २२,गणेश छगन उर्फ छबू वाकळे वय २८, पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर वय ४२ तिघे रा पारगाव हे या अपघातात मयत झाले आहेत तर अक्षय गायकवाड आणि आणखी एक तरुण दुसऱ्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री झालेल्या अपघातात एकाच गावातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे

या अपघाता बाबत समजेलेली माहिती अशी की काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावातील महादेव मंदिराजवळ सरस्वती नदी पुलावर पारगाव येथील वरील तीन मयत इसम दुचाकी वर जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन हे पुलावरून खाली पडले त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे एक जण जागीच ठार तर दोघांचा श्रीगोंद्यात उपचारा दरम्यान रात्री मृत्यू झाला.

त्यानंतर या अपघातात जागीच ठार झालेल्या
मयताची डेडबॉडी श्रीगोंद्याला घेऊन जात असताना श्रीगोंदा – पारगाव रस्त्यावर डेडबॉडी घेऊन जाणारी रुग्णवाहीका आणि पारगावच्या दिशेने जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात रुग्णवाहिकेचा चालक अक्षय गायकवाड आणि मयत व्यक्तीचा पुतण्या हे दोघे गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले त्या लोकांनी मोठ्या मेहनतीने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून या जखमी तरुणांना बाहेर काढत तात्काळ श्रीगोंद्यात उपचारासाठी पाठवले दुसऱ्या कारमधील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली.पोलिसांना घटनेबाबत माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोन विचित्र अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले या बाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
80 %
8.4kmh
100 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
error: Content is protected !!