नागवडे कुटुंब हाच आमचा पक्ष; अनुराधाताई नागवडे ह्याच आमच्या आमदार! संवाद कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार..!

लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. २२ सप्टेंबर २०२४ :
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू हेच आमचे खरे दैवत; नागवडे कुटुंब हाच आमचा पक्ष; आणि आगामी २०२४ विधानसभेच्या सौ अनुराधाताई नागवडे ह्याच आमच्या आमदार अशा तीव्र भावना श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे समर्थक कार्यकर्त्यांनी श्रीगोंद्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केल्या.

आगामी २०२४ विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागवडे समर्थकांचा भव्य असा कार्यकर्ता संवाद मेळावा छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते. प्रारंभी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज तालुक्याचे भाग्यविधाते नागवडे कारखान्याचे संस्थापक दिवं. शिवाजीराव नागवडे बापू यांच्या प्रतिमेचे पूजन बापूंच्या जुन्या पिढीतील अंबादास दरेकर व गोपीचंद इथापे यांचे शुभहस्ते करत या मेळाव्यास प्रारंभ झाला.

यावेळी व्यासपीठावर माजी संचालक अंबादास दरेकर, गोपीचंद इथापे, तुळशीराम रायकर, विलासराव काकडे, सतीश मखरे, समीर बोरा, शरद जमदाडे, नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक निरीक्षक बी. के लगड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविक ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड यांनी या कार्यकर्ता मेळाव्याचा उद्देश सांगताना लगड यांनी सांगितले की; आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नागवडे कुटुंबाला पक्षाकडून तिकीट मिळो अगर न मिळो परंतु सौ अनुराधाताई नागवडे या निवडणुकीच्या रणांगणात उभ्या राहणार आहेत. यासाठी गावप्रमुख गटप्रमुख नागवडे समर्थक व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून आगामी निवडणुकीची पुढील दिशा याबाबत हेतू स्पष्ट करताना सांगितले नागवडे कुटुंबीयांनी सत्तेशिवाय तालुक्यात सहकार, कृषी, शिक्षण, सिंचन या क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. याचे स्मरण होणे गरजेचे आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले की; ४० वर्षे सत्ता नसताना नागवडे कुटुंबीयांनी तालुक्यात लाजवेल असे काम केले आहे. परंतु ज्यांच्या हाती चाळीस वर्षे तालुक्याची सत्ता होती त्यांचे योगदान कुठेच दिसून येत नाही. आम्ही बारामतीची पुनरावृत्ती करू अशा वल्गना केल्या परंतु त्यांच्याकडून कोणतेच भरीव असे विकासाचे काम झालेले दिसत नाहीत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. यासाठी आता ज्या नागवडे कुटुंबीयांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. त्या नागवडे कुटुंबांचा आता आमदार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. सौ. अनुराधाताई नागवडे ह्या श्रीगोंदा- नगर मतदार संघात प्रत्येकाच्या सुखदुःखात रात्रंदिवस सामील होत आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बापूंच्या नंतर खऱ्या अर्थाने वारसा राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे वहिनींनी सक्षमपणे चालू ठेवला आहे. तेव्हा आता कार्यकर्त्यांनी बापूंच्या त्यागाची व भरीव विकासाच्या कार्याची प्रत्येक गावात जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी काष्टी गटातील कार्यकर्ते चांगदेव पाचपुते यावेळी म्हणाले मी जरी पाचपुते असलो तरी माझी विचारधारा ही नागवडे कुटुंबाशी खंबीरपणे जोडलेली आहे. नागवडे कुटुंबातील सुसंस्कृत विकासाची दिशा देणारी चांगली माणसे भेटली व मला देव भेटला असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत काष्टी गटातून सौ अनुराधाताई नागवडे यांना सर्वात जास्त मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली.

बेलवंडी गटातील कार्यकर्ते शहाजी गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की; आपण नागवडेंना का? आमदार केले पाहिजे; यासाठी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. ४० वर्षात विद्यमान आमदारांचा लेखाजोखा तपासा आणि सहकार महर्षी बापूंचे ६० ते ६५ वर्षातील योगदान पहा मग खऱ्या अर्थाने तालुक्याचा विकास कोणी साधला याची जाणीव होईल. सहकार महर्षी बापूंनी सहकार चळवळ तर मोठ्या संघर्षातून उभी केल्यानंतर एवढ्यावरच बापू थांबले नाहीत तर त्याबरोबर घोड कुकडीचे देखील या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळवून दिले आणि आज श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी या बापूंच्या योगदानातून प्रगतशील झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शेतकरी कार्यकर्त्यांनी देखील नागवडे कुटुंबातील आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले.

निमगाव खलूचे रमेश जाधव यावेळी आपले परखडपणे विचार मांडताना म्हणाले की तालुक्यातील जनतेने विद्यमान आमदारांना ४० वर्षे संधी दिली. त्यांनी तालुक्याची अक्षरशः रांगोळी केली. असे सांगून ते पुढे म्हणाले की आमदारकीच्या जोरावर त्यांनी कोणतेही तालुक्यातील विकासाचे भरीव काम न करता ठेकेदार व कार्यकर्त्यांना अभय दिला. आणि मतदारांचा फक्त मतदानासाठी वापर केला. ना त्यांच्याकडे आदर; ना त्यांच्याकडे प्रेम; फक्त आम्हाला सत्ता एवढेच त्यांचे काम असे सांगत जाधव आणखी पुढे म्हणाले की; नागवडे कुटुंबीयांनी मागील २०१४ च्या निवडणुकीत राहुल जगताप यांना पाठिंबा देत आमदार केले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांना देखील पाठिंबा देत निवडून आणले. याची जाणीव मात्र त्यांना नाही नागवडे कुटुंबांनी त्यांच्याशी सहकार्याची भावना ठेवली मात्र या उलट त्यांनी नागवडे कारखाना निवडणुकीत पॅनल उभा केला. परंतु सभासद शेतकऱ्यांचे नागवडे कुटुंबावर असलेले सतत श्रद्धा; प्रेम व विश्वासाच्या जोरावर स्थापनेपासून नागवडे कारखाना नागवडे कुटुंबाच्या ताब्यात दिल्याचे आवर्जून यावेळी सांगितले. असे सांगून ते पुढे म्हणाले की; कुठल्याही परिस्थितीत आता नागवडे कुटुंबातीलच आमदार करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट घेणार असल्याचे सांगितले.

लिंपणगाव गटातील कार्यकर्ते बापूराव कुरुमकर यावेळी बोलताना म्हणाले की; नागवडे कुटुंब हे स्वच्छ प्रतिमेचे कुटुंब आहे. त्यामध्ये सहकार महर्षी बापूंचे तालुक्यासाठी असलेले भरीव योगदान. त्यामुळे अनुराधाताईंनी पक्षाचे तिकीट मिळो अगर न मिळो अपक्ष उमेदवारीची वेळ आली तरी मागे हटू नये सर्व कार्यकर्ते तन-मन-धनाने तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू अशी ग्वाही दिली.

संजय क्षिरसागर, समीर बोरा, वाजे आदी कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की; नागवडे कुटुंबांनी साखर कारखानदारी चालवताना कोणालाही फसवले नाही. विकासातही मागे नाही. बापूंचा आशीर्वाद तर सतत आहेच आपण कुठेच कमी नाही. त्यामुळे नागवडे कुटुंबाचा आमदार होणे हाच आमचा निर्धार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील विद्यमान आमदारांच्या बाबत विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी इत्यादींच्या भावना मोठ्या तीव्र आहेत. चाळीस वर्ष श्रीगोंदा तालुक्याची विद्यमान आमदारांनी सत्ता भोगली. परंतु ती स्वतःच्या प्रगतीसाठीच स्वतःचे खाजगी कारखाने; दूध डेअरी उभ्या केल्या; परंतु त्यांना त्या टिकवता आल्या नाहीत. हे आपण सर्वजण पाहत आहोत. याउलट त्यांना सहकाराचे काहीच देणे घेणे नाही. सहकार महर्षी बापूंनी मात्र सत्ता नसताना देखील गेली ६०; ६५ वर्ष सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तालुक्यातील जनतेला जे जे हवे ते ते बापूंनी मिळवून दिले. वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे बापूंनी दुर्लक्ष केले परंतु सर्वसामान्य माणूस हेच माझे कुटुंब मानले. मागील परिस्थितीची आठवण करून देत नागवडे यांनी आणखी पुढे म्हणाले की नागवडे कारखाना ६५ वर्षाचा आहे विरोधकांचे खाजगी कारखाने दहा ते वीस वर्षाचे आहेत. या कारखान्यांची आज काय परिस्थिती आहे? हे देखील आपण सर्वजण पाहत आहोत. नागवडे आणखी पुढे म्हणाले की आता यापुढे राजकारणाची दिशा बदलली आहे. प्रत्येक पक्षाचा नेता येऊन शब्द देतो. उमेदवारी जाहीर करतो. त्यामुळे राजकारणाची पूर्णतः खिचडी झालेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळो अगर न मिळो” बापू “हेच आपले दैवत! नागवडे हाच आमचा पक्ष! उद्याच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकी त सौ अनुराधा वहिनी नागवडे यांची उमेदवारी करायची म्हणजे करायची. आता आम्ही ठरवले कार्यकर्त्यांनी ठरवले. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की ज्यांना स्वतःचा कारखाना चालवता आला नाही त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवू नये. असा इशारा देत नियती कुणालाही माफ करत नाही.” जैसी करनी वैसी भरणी” अशी वेळ विरोधकांवर आलेली असून आता कार्यकर्त्यांनी गाफील न राहता तन-मन धनाने विधानसभा निवडणुकीसाठी सर्व शक्तीनिशी सज्ज व्हावे. असे आवाहन देखील राजेंद्र नागवडे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावातील नागवडे समर्थक, ग्रामपंचायत, सेवा संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नागवडे कारखान्याचे संचालक प्रा. सुरेश रसाळ यांनी मानले.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
few clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
20 %
4.8kmh
16 %
Thu
33 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
39 °
error: Content is protected !!