संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी – प्रमोद म्हस्के
श्रीगोंदा, ता. २५ : सध्या श्रीगोंदा पंचायत समिती हि गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरून चर्चत आहे.काल-परवाच नरेगा विभागाच्या गैरकारभाराविरुद्ध गाई-गुरांसह धरणे आंदोलन करण्यात आले होते.
श्रीगोंदा पंचायत समितीत कर्मचाऱ्यांना शिस्तेचे धडे शिकवणारे अधिकारी मनमानी करताना दिसत आहेत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवा नेते प्रमोद राजेंद्र म्हस्के यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नमूद तक्रार अर्जात म्हटले आहे की,
शासन निर्णयानुसार पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कायमस्वरूपी अथवा कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी शासन परिपत्रकाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
परंतू श्रीगोंदा पंचायत समितीत अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नाही. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान करून येतात. वरीष्ठ अधिकारी येणार असेल तरच हे ओळखपत्र परिधान करतात. त्यामुळे पंचायत समितीत अधिकारी व कर्मचारी हे नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत.
शासन निर्णयाचे पालन करण्यासंदर्भात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करावे व आपण आदेशित करूनही जर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करून दिसून आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.