श्रीगोंद्यात आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा!

शिवस्वराज्य यात्रेस जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार – राहुल जगताप

श्रीगोंदा, ता. २६ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा आज दि. २६ रोजी श्रीगोंद्या मध्ये पोहोचणार आहे. सायंकाळी ६ वाजता संत शेख महंमद महाराज पटांगणामध्ये या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आ. राहुल जगताप यांनी दिली.

या शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी दिली तसेच या शिवस्वराज्य यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्राची घढी विस्कटू नदेण्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा विचार घेऊन आलेल्या या शिवस्वराज्य यात्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून राहुल जगताप पाटील मित्रपरिवार व आर.जे. ग्रुप श्रीगोंदा – नगर तालुका यांच्या वतीने सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात…

 

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
25.4 ° C
25.4 °
25.4 °
79 %
7.3kmh
76 %
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
32 °
error: Content is protected !!