जाहिरात…
उमेदवारी बाबत मोठ्या साहेबांचा निर्णय अंतिम – श्रीनिवास नाईक
श्रीगोंदा, ता २६ : श्रीगोंदा मतदारसंघा मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी राष्ट्रवादी विध्यार्थी माजी प्रदेशउपाध्यक्ष श्रीनिवास नाईक यांनी इच्छुक असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून फार्म ही भरला आहे.
उमेदवारी संदर्भात शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ही भेट घेतली आहे यावेळी त्यांनी सकारात्मक चर्चा केली त्यांच्याबरोबर मी काम केले आहे शासकीय कामाचा मला अनुभव असल्यामुळे जर पक्षाने संधी दिली तर श्रीगोंदा मतदारसंघा मध्ये विधानसभेची उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या बाबत सविस्तर माहिती देत ते सोडवणूक करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघ १५९ गावे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील वाळकी, चीचोंडी पाटील गट मिळून मतदार संघाचे ४ भाग होतात घोड धरण लाभक्षेत्र, कुकडी लाभक्षेत्र,पाट पाणी पासून वंचित भाग – कोळगाव, मांडवगण, रुईखेल, बांगर्डे, नगर तालुक्यातील वाळकी आणि चिचोंडी पाटील जिल्हा परिषद गट मधील गावे, साकळाई उपसा जलसिंचन योजना अंतर्गत गावे असे चार भाग होतात.
तसेच काष्टी, श्रीगोंदा, बेलवंडी, विसापूर पारगाव येथील बंद रेल्वे स्टेशन सुरू करण्याची गरज असून रेल्वे थांबा करण्याची आवश्यकता आहे. तसेच कुकडी कालवा न्याय पाणी वाटप, डिंभे माणिकडोह बोगदा साकळाई उपसा जलसिंचन योजना, एमआयडीसी, उपजिल्हा रुग्णालय, सिसर सोनोग्राफी मोफत सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इमारत,खाकी बाबा चारी,रेल्वे उड्डाणपूल,श्रीगोंदा येथे फूट पाथ,अधिकारी वर्ग लोकांची कामे वेळेवर करत नाहीत त्या संदर्भात समस्या निवारण,श्रीगोंदा येथील पोलिस कर्मचारी वसाहत,बेलवंडी पोलीस स्टेशनला कर्मचारी वसाहत प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार, श्रीगोंदा येथे उप जिल्हा रुग्णालय उभारणी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इमारत, अभ्यासिका,महीला सक्षमीकरण, जिल्हा परिषद शाळा जीवंत राहाव्यात यासाठी प्रयत्न,शासकीय रुग्णालय सिझर, सोनोग्राफी मोफत सोय,एस टी बसेस नव्या गाडयांची मागणी,पिसोरा भागात चारी करावी लागेल,सुरोडी पासून मुख्य कालव्यातून कोळगाव भागात पाणी देता येईल किंवा विसापूर मधून लिफ्ट इरिगेशनचे पाणी देता येईल,मोहोर वाडी तलाव देखील पर्याय आहे.खाकी बाबा चारी पिसोरा, मांडवगण साठी लाभदाययी आहे.
अशा अनेक तालुक्यातील प्रश्नांवर आपण काम करून त्याची सोडवणूक करू. मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे पक्षाने जर संधी दिली तर संधीचे सोने करेल असे श्रीनिवास नाईक यांनी यावेळी सांगितले.