श्रीगोंद्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सभा
श्रीगोंदा, ता. २७ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यांमध्ये शिवस्वराज्य यात्रा काढून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. राहुल जगताप पाटील मित्र परिवार आणि आर जे ग्रूप कडून दि.२६ रोजी श्रीगोंद्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शिवस्वराज्य यात्रेमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
राहुल जगताप यांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला असता परंतु श्रीगोंद्याच्या जनतेचा दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी तिकडे जाण्याचे टाळलं तात्पुरता त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे मिळाले नाहीत या गोष्टी झाल्या ६०० कोटी तोट्यामध्ये गेलेल्या कारखान्याला ५०० कोटी कर्ज दिले जाते त्याच वेळी १२० कोटी नाकारले जातात परंतु बुडणाऱ्याला पैसे देण्याची शिफारस कोणी केली याची माहिती घ्यावी लागेल. आपल्याकडे येईल त्याला पाहिजे ते विरोधात जाईल त्याचा प्रचंड संकटात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामान्य माणसाचे प्रश्न माणुसकी काही लोक विसरून गेले आहेत फक्त लाडक्या खुर्चीसाठी जो उपयोगी पडेल त्यालाच मी जवळ करेल बाकी सगळे खड्ड्यात गेले तरी चालतील अशी मानसिकता असणारे सत्तेत बसले आहेत.
संकटकाळी जे आमच्या बरोबर राहिले त्यांना आम्ही सोडणार नाहीत राहुल दादा तुम्ही काय काळजी करू नका असं म्हणत एक प्रकारे उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल त्यांनी दिला. सगळे होते त्यावेळेस पक्षाचे फक्त चारच खासदार होते हे गेल्यानंतर आठ खासदार झाले. मराठी माणसाचे दोन नेत्यांचे पक्ष महाराष्ट्रात फोडण्यात आले तरीही भाजपला सांगावे लागते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखावे लागेल यासाठी वरून खाली पर्यंत आदेश देण्यात आले. पवार साहेबांनी माणसाच्या मागे उभा राहण्याचे काम केले आहे त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे उभे राहणार आहे.
अडचणीच्या काळामध्ये जे लोक गुडघे टेकतात त्यांच्यावर सवलतींची खैरात होते. कुकडी, घोड कारखान्यांना थकमी नाकारण्यात आली ज्या ज्या कारखान्यांना सरकारकडून थक हमी देण्यात आली ते कारखाने एनपीए मध्ये गेले होते त्या कारखान्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी एकच पवार साहेबांचे साथ सोडली होती किंवा वतनदारीची झुल पांघरून मुजरे करने पसंत केले होते अभिमान आहे या पठ्ठ्याचा याने मान झुकवली नाही या पठ्ठ्याला अडचणीत आणण्यासाठी फक्त कुकडी कारखान्याची १२० कोटीची फाईल अडवली गेली त्यांना माहीत होतं असं केलं तर हा पठ्ठ्या गायकुतीला येईल गुडघे टेकेल परंतु याने पवार साहेबांची साथ सोडली नाही राजकारणासाठी ज्यांनी ही सहकारी संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यांना शेतकऱ्यांचे संसार दिसले नाहीत याचे फार मोठे दुर्दैव आहे. निवडणूक येथील निवडणुका जातील पण राजकारण्यांपाई कोणी शेतकऱ्यांच्या मुळा उठत असेल तर त्याला मुळासकट उखडून फेका. महाविकास आघाडीचाच उमेदवार श्रीगोंदा मतदार संघामधून निवडून द्या असे आवाहन यावेळी अमोल कोल्हे यांनी केले.
लाडक्या दाजीच्या दुधाला अधी भाव वाढ द्या..!
शेतकऱ्यांच्या दुधाचा बाजार भाव कमी करून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये सरकार देते वरून महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देता जे कोणी लाडकी बहीण म्हणतील त्यांना सांगा दाजीच्या दुधाला अधी भाव वाढ द्या, दुधाप्रमाणेच कांद्यालाही बाजार भाव नाही सरकारने निर्यात बंदी करून पाकिस्तान वरून कांदा आयात केला हे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. खते बी बियाणे यांचे बाजार भाव वाढवून त्यावर मोठा कर आकारून शेतकरी अडचणीत आला. शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्याची दिवसाची १७ रुपये किंमत या भारतीय जनता पार्टी सरकारने केली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आकारून गोरगरीब अडचणीत आणण्याचे काम या भारतीय जनता पार्टीने केले आहे अशी टिका अमोल कोल्हे यांनी यावेळी केली.
कुकडी कारखान्याचे येत्या पाच तारखेच्या आत कोणाचेही देणे देण्याचे राहणार नाही..!
राहुल जगताप यांनी सांगितले की डिंभे माणिकडोह बोगदा झाला तर ३. ५ टी एम सी पाणी वाढते यासाठी पवार साहेबांनी मंत्रालयामध्ये तीन मीटिंग घेतलेल्या आहेत तसेच साकळाई पाणी योजना ही येथील चाळीसगावांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवणारी आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे हे दोन प्रश्न आपण सोडवावे तसेच शेतकऱ्यांवरील सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी जयंत पाटील यांच्या कडे केली तसेच कुकडी कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करत असताना एनसीडीसी कडून पैसे मिळत असतानाही जाणीवपूर्वक पवार साहेबांबरोबर असल्यामुळे बाजूला करण्यात आले परंतु मी पवार साहेबांना भेटलो त्यांनी सर्व अडचणी सोडवलेल्या आहेत येणाऱ्या पाच तारखेच्या आत कोणाचेही देणे देण्याचे राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
विधानसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ५० हजाराची लीड देणार..!
आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही मागे हटणाऱ्यातले नाहीत आदरणीय तात्या आणि बापू यांच्या विचारांचे रक्त आमच्या अंगात भिणते आम्हाला मोडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मोडून निघणार नाहीत कारण सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभेच्या वेळी श्रीगोंदा मतदारसंघातून ३४ हजाराची लीड मिळाली होती आता विधानसभेवेळी ५० हजाराची लीड देणार अडचणीच्या काळात पवार साहेबांच्या पाठीमागे जे उभे होते त्यांचाच विचार यावेळी करावा असे जगताप यांनी बोलताना सांगितले.
या सभेसाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तसेच अतुल लोखंडे, जिजाबापू शिंदे, हरिदास शिर्के, केशवराव मगर, बाबासाहेब इथापे, दिपक भोसले, राजू गोरे, शाम जरे, दादासाहेब औटी, सुभाष काळणे आदी मान्यवर सभेला उपस्थित होते.